इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनची जालना जिल्हा कार्यकारिणी जाहीर
इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्रात सक्रीय होणार-आयेशा खान मुलानी
जालना, महाराष्ट्र।
जालना येथील शासकीय विश्रामगृहावर इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जालना जिल्हा कमिटीची बैठक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकित पत्रकारांच्या समस्या, विविध ठिकाणी संघटनेचे विस्तार व आगामी कार्यक्रम या विषयी चर्चा करण्यात आली गया. यावेळी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांनी सांगितले की शासनाने महाराष्ट्र विधान परिषदेत शिक्षक मतदार संघाप्रमाणे पत्रकार मतदार संघ निर्माण करावे. शिक्षक आमदाराप्रमाणे पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी पत्रकारांचाही आमदार असावा. बैठकीत इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या नवनियुक्त वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष आयेशा खान मुलानी यांनी सांगितले की इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनला सक्रीय करून महाराष्ट्रात मजबूत करून पत्रकारांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.याप्रसंगी आयेशा खान मुलानी (कार्यकारी संपादक आजचा चित्रलेखा) यांची महाराष्ट्र वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष व बालाजी अडियाल (संपादक आजचा चित्रलेखा) यांची प्रदेश सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनची जालना जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये आमेर खान (संपादक ज़लज़ला टाईम्स) जिल्सा अध्यक्ष, नरेश अण्णा श्रीपत (न्यूज़ इंडिया वन) जिल्हा महासचिव, जावेद खान (दैनिक लोकतांत्रिक जंग) जिल्हा उपाध्यक्ष, सय्यद महेबुब (दैनिक किंगमेकर टाईम्स) जिल्हा सचिव, शेख सलीम (जालना सिटीझन) जिल्हा उपाध्यक्ष, सुनील भारती (दैनिक प्रबंध भूमि) मिडिया प्रभारी, जावेद तांबोळी (महाराष्ट्र न्यूज) व बासिद बेग (ग्लोबल न्यूज) यांची जिल्हा काउन्सिल सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
© Copyright All rights reserved by India Khabar 2025